महत्त्वाच्या बातम्या

चाकण मधील कडाचिवाडी येथील पाझर तालावत बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

           पुण्यालगतच्या चाकण येथील कडाचीवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. चाकण परिसरात कडाचीवाडी येथील तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. श्लोक जगदीश मानकर  (मूळ रा. अमरावती ), प्रसाद शंकर देशमुख, (मूळ रा.अंबुलगा, जि. नांदेड), नैतिक गोपाळ मोरे (मूळ रा. बुलढाणा जि अकोला), ओंकार बाबासाहेब हांगे (मूळ रा.हंगेवाडी, जि.बीड)अशी मृत पावलेल्या मुलांची नावे असून हे सर्व जण 13 वर्षांचे होते. ही मुले मेदनकरवाडी येथील रहिवासी असून शनिवारी सकाळी 11 वाजता ते तलावात पोहण्यासाठी गेले होते.
       दुपार पर्यंत चौघेही घरी आले नाहीत म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरु केली. कडाचीवाडी येथील तलावाच्या काठावर मुलांचे कपडे व बूट सापडले त्यानंतर स्थानिकांनी आपत्ती मित्रांच्या साहाय्याने मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. चारही मुलांचे मृतदेह चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चाकण पोलीसांनी पंचनामा तयार करून मुलांचा अपघाती मृत्यू असा गुन्हा नोंद केला आहे. मुलांचे मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश करत हंबरडा फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!