महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील सदाशिव पेठेत 12 जणांना भरधाव कारने उडवले

       पुण्यातील सदाशिव पेठेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी साडे पाच च्या सुमारास एका भरधाव  कारने 12 जणांना उडवले आहे. हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे  विद्यार्थी होते. ही घटना सदाशिव पेठेतील भावे हायस्कुल जवळ घडली असून सर्व जखमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कॅब ने 12 मुलांना धडक दिली असून संबंधित कॅब ड्रायव्हर हा पुण्यातीलच रहिवासी असून जयराम शिवाजी मुळे असे त्याचे नाव आहे. त्याने मद्य प्राशन केले होते. सदाशिव पेठेत विद्यार्थी चहा पिण्यासाठी नाथसाई दुकानात उभे राहिले होते. त्याचवेळी टुरिस्ट गाडी हुंदाईने भरधाव वेगात 12 मुलांना उडवले. यातील काही जणांना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित कार चालकास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!