चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकरिता फेसलेस सुविधा
चारचाकी खासगी वाहनाकरिता एमएच १२-एक्सआर या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन आरक्षित करण्याकरिता २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फेसलेस सुविधा सुरु होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाहीत असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही कळविले आहे.
