छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र शासन भाषा मंडळ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, शिवाजी ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजना छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०१ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविला जाणार आहे.
यानिमित्ताने आज दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ग्रंथालयामध्ये आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. रोशनआरा शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. किशोर सुतार यांनी वाचन संकल्पाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील डॉ. संपत पिंपळे डॉ. राज चव्हाण व इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. नवनाथ वहिप्पर यांनी सर्व उपस्थित यांचे आभार मानले. सर्व ग्रंथालय सेवकांनी हे प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी मेहनत घेतली.१ तारखेस छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे ” वाचन कौशल्य विकास कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आली असून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचे मार्गदर्शक व्याख्यानाने या कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. या कार्यशाळेत डॉ.देवानंद सोनटक्के , डॉ.आदिती काळमेख, वैदेही कुलकर्णी इत्यादी वक्त्यांची संवाद सत्रे आयोजित केली आहेत. विद्यार्थ्यांना वाचन विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा डॉ.सुभाष वाघमारे यांनी दिली.
