सासपडे हरपळवाडी हद्दीत जड वाहनांमूळे अपघाताची स्थिती
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक वेळा वाहन चालकांच्या हलगर्जीपणा मुळे व वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होण्याची शक्यता असते. कराड मधील खडी क्रेशर कोंजावडे ते सासपाडे हरपळवाडी हद्दीतून अतीत निसराळे NH4 कडे जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या वाहनांवर नियंत्रण नसते तसेच या गाडयांना ब्रेक, लाईट, इंडिकेटर, फ्रन्ट लाईट नसून वाहने भरधाव वेगात असतात त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात होतात. ट्रक मधील मटेरियल वर वरून सेफ्टी नसल्यामुळे येथील स्थानिकांना तसेच इतरांना याचा त्रास होत असून ही गंभीर बाब आहे.
सासपाडे हरपळवाडी तालुका कराड हद्दीतून मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त डम्पर ओव्हरलोड भरून भरधावं वेगाने धावत आहेत. ह्या गाडयांना नियमाप्रमाणे रेडीयम नसल्यामुळे व मालाच्या वरून कोणतीही सेफ्टी नसल्यामुळे मागून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच स्थानिकांना, शेतकरी, वाड्या वस्त्यावरील लोकांना अति प्रमाणात त्रास होत आहे. तसेच या रोड वर अनेक अपघात झालेले आहेत. या भागात सीसीटीव्ही नाहीत. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिकांनी प्रादेशिक परिवहन अधिक्षक यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली गेली नाही. ही बाब गांभीर्याने न घेतल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आरपीआय चे सातारा तालुका अध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
