महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज : स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक!

नवी मुंबई :  विश्वास नांगरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते म्हणतात “छावा………ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात,त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते!
‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार !’केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द ! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे
फौज तो ‘तेरी सारी हैं
पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा
अब भी सब पे भारी हैं !
छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपतीशिवाजीजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला ! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून ?
आम्ही घ्यावा निर्भयपणा,
आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,
विचारांची आणि कृतींची
आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं,
घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,
करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म !
समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा !
राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,
शेर शिवराज आणि त्यांचा छावा !
जगदंब जगदंब !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!