महत्त्वाच्या बातम्या

जंगली  हिंस्र प्राण्याच्या नख्यांची तस्करी करणाऱ्या एकास अटक तर दुसरा फरार

        कराड- जंगली हिंस्र प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी अशीच एक घटना समोर आली आहे. शहरातील शनिवार पेठेत सागर लॉज जवळील तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रात्री साडे अकराच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून जंगली प्राण्यांच्या नख्यांची तस्करी करणाऱ्यास  अटक केले आहे. श्रीकृष्ण उर्फ  गोट्या शंकर कलढोणे (वय 24) (रा.देशिंग ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) असे आरोपीचे नाव असून त्याचा एक साथीदार सुदर्शन यादव (रा. विश्रामबाग, सांगली) हा फरार आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आरोपीकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी श्रीकृष्ण उर्फ गोट्या कलढोणेची झडती घेतली त्यातून तीस लाख रुपयांच्या दोन नख्या 9600 रुपये रोख तसेच कोयता आढळून आला. शनिवार पेठेतील तीन मजली बिल्डिंगच्या टेरेसवर दोन संशयित राहतात याची खबर पोलीस गुन्हे शाखेला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भोपकर यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकून एकास पकडले परंतु दुसरा आरोपी सुदर्शन यादव हा    अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!