महत्त्वाच्या बातम्या

विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शाहू स्टेडीयम येथे मानवी साखळीचे आयोजन

      विधानसभा निवडणुक प्रक्रियेसाठी सर्वच उमेदवारांची जोरदार प्रचाराची तयारी सुरु झाली असून गावभेट दौरे चालू आहेत.  यातच विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग व जिल्हा परिषद यांच्या वतीने आज सकाळी शाहू स्टेडीयम येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच शासकीय कर्मचारी व शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
      सर्व उपस्थिती कर्मचाऱ्यांनी  महाराष्ट्राचा नकाशा तयार करून त्यात सातारा- जावली विधानसभा मतदारसंघ वेगळा दर्शवणात आला होता. त्याचबरोबर 262 सातारा जावली  १०० % ही आद्याक्षरे मानवी साखळीतून दर्शवण्यात आली . हे दृष्य पाहण्यास सातारा शहरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!