जनता अर्बन बँक वाई व पाचवड शाखेचा २८ वा वर्धापनदिन संपन्न
सर्वसामान्य जनतेने आपली मानून त्या आधारावर आज जनता अर्बन बँकेने बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, ग्राहकांनी व सभासदांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास व कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक कामामुळे आजही बॅंक भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोदगार बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेशराव कोरडे यांनी काढले.
जनता अर्बन को-ऑप बॅंक लि. वाई , पाचवड शाखेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष बळीराम जगताप, उपाध्यक्ष प्रा शेखर फरांदे सर, व्यवस्थापक सौ रुपाली बुलुंगे, संचालक नीलकंठ मोरे, रमेश बुलुंगे, महेंद्र जमदाडे, उद्योजक विजय इथापे, शाखाप्रमुख संजय वरे,विजय लोखंडे, विक्रम कोरडे, वैभव जमदाडे, संदीप बाचल यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्योजक व बँकेचे सभासद विजय इथापे म्हणाले, ग्राहकांच्या विश्वासावर बँकेने बँकिंग क्षेत्रात देखील मोठी प्रगती केली आहे. त्यांची उन्नत्ती आभाळाएवढी व्हावी. शाखाधिकारी संजय वरे यांनी बँकेने सुरू केलेल्या योजना लाभदायक असून अशा सर्व विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. यावेळी विजय मोझर,अतुल इथापे, विशाल गायकवाड, वैभव गायकवाड, अमितकुमार इथापे, संतोष पिसाळ, प्रविण धुमाळ, दत्ता मोरे, राजेंद्र जाधव, प्रदिप बोराटे, मोहन चव्हाण, संजय जगताप, चंद्रकांत शिंदे, विनायक इथापे,राहुल पवार, चंद्रकांत शिंगटे, अनिल शेलार, सुजित भिलारे, वंदना सुर्वे, नरेंद्र बाबर, सतीश पिसाळ, सचिन शिपटे, जितेंद्र गायकवाड, अहंकार पवार, बंडू चव्हाण, संजय पवार,विजय इथापे, डि.एस. गायकवाड, महेश गायकवाड, संदीप पवार, संदीप निकम, अशोक शेवते, लतिफ पठाण, माणिक पवार, दिलीप बोराटे, प्रकाश काटवटे, हेमंत पवार, विशाल बोराटे, संतोष बोराटे, विकास महामुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी बँकेच्या वतीने रुपाली रासकर व तनुजा यादव, योगेश शेवते, विश्वनाथ बोराटे यांनी सर्वांचे स्वागत केले.आभार रुपाली रासकर यांनी मानले.
