महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात उद्यापासून विश्व मराठी संमेलनाचा भव्य शुभारंभ

  विश्व मराठी संमेलनाचा भव्य शुभारंभ उद्या ३१ जानेवारी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे होणार आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित या संमेलनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर केला जाणार आहे.
उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
हा भव्य सोहळा मा. देवेंद्र फडणवीस(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)मा. अजित पवार(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)आणि मा. मुरलीधर मोहोळ(केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक)  प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच अँड राहुल नार्वेकर (अध्यक्ष विधानसभा )राम शिंदे(सभापती, महाराष्ट्र विधान परिषद) उदय सामंत(मंत्री उद्योग व मराठी भाषा) दत्तात्रय भरणे(मंत्री क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास व औकाफ) नीलमताई गोरे(उपसभापती महाराष्ट्र र विधान परिषद) चंद्रकांतदादा पाटील(मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य )आणि श्रीमती माधुरीताई मिसाळ(राज्यमंत्री, नगर विकास,परिवहन सामाजिक न्याय,वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ )यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
परिसंवाद
मराठी भाषा, साहित्य, शिक्षण आणि प्रसारमाध्यमांवर तज्ज्ञांची चर्चा
 कवी संमेलन
विविध प्रादेशिक आणि निमंत्रित कवींच्या सहभागातून रंगतदार सत्र
सांस्कृतिक कार्यक्रम: लोककला, संगीत, नृत्य आणि नाटकांचे विविध सादरीकरण
 पुस्तक प्रदर्शन: विविध प्रकाशकांची पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध
विशेष व्याख्याने: मराठी भाषा आणि साहित्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन
संमेलनाचा उद्देश
मराठी भाषेचा विकास व जागतिक स्तरावर प्रसार करणे. हे संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडणार आहे. मराठी प्रेमींसाठी ही एक अनोखी संधी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!