जयराम स्वामी विद्यामंदिर, वडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज हुतात्मा मंडळ संचलित जयराम स्वामी विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज वडगांव (ज.स्वा) येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा कराड उत्तरचे आमदार माननीय श्री.मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
माजी आमदार प्रभाकरजी घार्गे साहेब, श्री.महेशजी पवार सीनियर ऑडिटर ISO, समताताई घोरपडे महिला सखी मंच अध्यक्षा, विकास घार्गे चेअरमन जयराम स्वामी विद्या मंदिर, अंकुश घार्गे उपाध्यक्ष, महेश घार्गे संचालक मार्केट कमिटी, सुधीर बावडेकर, शिदोजीराव घार्गे, संदीप भोसले चेअरमन विकास सोसायटी, दादा घार्गे व्हा. चेअरमन, सचिन घार्गे युवा नेते, सुनिता मगर बाजार समिती सदस्या, दादासाहेब कोकाटे, सचिन सुतार संचालक, प्रकाश सोरटे व सर्व शिक्षक व विध्यार्थी वडगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
