महत्त्वाच्या बातम्या

जयहिंद फॉउंडेशन चा वार्षिक स्नेहमेळावा संपन्न

     महिलांच्या बाबतीत आपला समाज अजूनही पुढे गेलेला नाही. समाजात विधवा प्रथाबंदी झालीच पाहिजे आणि हे कार्य हाती घेऊन जयहिंद फॉउंडेशन पुढे जात आहे. शहीद सैनिक परिवार असो कि विधवा प्रथाबंदी जयहिंदने चालविलेल्या कार्याला सलामच केला पाहिजे. असे गौरवोदगार इन्फोसिस कंपनीचे हेड नितीन बारावकर यांनी काढले. 
        जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने वाई येथे येथे झालेल्या वार्षिक स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयहिंद फॉउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, राष्ट्रीय संचालक डॉ. केशव राजपुरे, डॉ.नितीन कदम, स्वप्नील मांढरे, मनीषाताई अरबूने, सातारा जिल्हाध्यक्ष जयदीप भोसले, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई कदम, जिल्हासचिव उमेश मोरे, जावळी तालुकाध्यक्ष रविंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पुढे बोलताना बारवकर म्हणाले, प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी पुरुषांनी पाठबळ देणे गरजेचे आहे. सावित्रीच्या लेकींचा सन्मान सावित्रीच्या लेकिनीच केला पाहिजे त्यांच्या सक्ष्मीकरणासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा. मग ती आपल्या घरातील असो कि समाजातील स्त्री असो तीचा योग्यतो सन्मान झालाच पाहिजे. जयहिंदच्या कार्याचा वाढता आलेख पाहता येणाऱ्या काळात शहीद जवानांचे परिवार यांना जयहिंद फॉउंडेशन म्हणजे आपले सुखः दुःख सांगण्यासाठीचे हक्काचे घर होईल त्यामुळे समाजातील प्रत्येकाने या जयहिंदच्या प्रवाहात सामील होऊन देशसेवा करावी.
       राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने म्हणाले, जयहिंदची सुरुवात झाल्यापासून प्रत्येक सभासदाने आपला हातभार लावला आहे. त्यांच्यामुळेच रोपट्याचा वटवृक्ष होत आहे. या कार्यात सगळ्यांची साथ हवी असते प्रत्येक काम हाती घेतलेले पूर्ण केले पाहिजे. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून काम केले पाहिजे. सर्व सभासदांची कृती समाजाच्या, सैनिकांच्या हिताची असली पाहिजे. तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत हे काम एकत्र येऊन झाले पाहिजे. हीच जिवाभावाची नाती टिकविण्यासाठी दुःखावर मात करून पुढहे गेले पाहिजे यातूनच जागरूक नागरिक घडले पाहिजे.
       यावेळी अनपटवाडी येथील विजय अनपट यांनी नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धा वेळेत पूर्ण करून आयर्नमॅन ‘किताब मिळविल्याबद्दल जयहिंदच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, जावळी, खटाव, वाई, मुंबईसह राज्यभरातून सर्व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाखा मधील पदाधिकारी सभासद तसेच आजी माजी सैनिक, वीर पत्नी,ब्वीर माता यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत मांढरे व आभार जयदीप भोसले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन जयहिंदच्या वाईशाखेच्या वतीने करण्यात आले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!