महत्त्वाच्या बातम्या

जावली तालूका भूमी अभिलेख शाखेचा भोंगळ कारभार; रिपाई कडून अनोख्या आंदोलनाचा ईशारा

    जावली तालुक्यात भूमी अभिलेख शाखेचे काम खूप कासवाच्या गतीने चालले आहे. जावली तालुक्यातील अनेक तातडीची, अति तातडीची मोजणीची कामे पैसे भरूनही लावकर होत नसल्याने सामान्य लोकांना सहा सहा महिने एक-दोन वर्ष थांबावे लागत आगे. त्यामुळे लोकांचे पैसा व वेळ विनाकारण मोजणी ऑफिसला वारंवार चक्कर घालण्यासाठी वाया जात आहे. तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सामान्य  लोकांना  कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगून कुठलीही व्यवस्थित माहिती देत नाहीत, सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक व मानसिक खूप कुचंबना होत आहे.

      जावली तालूक्यातील गावे,  डोंगर कपारी, दुर्गम भागात असल्याने अनेक गावांना एसटी किव्हा कुठलेही वाहन वेळेवर जात येत नाही तरी सुद्धा मोजणी वेळेवर व्हावी या अपेक्षेने मेढा या ठिकाणी अनेकांना वारंवार मोजणी ऑफिस ला चक्कर मारायला लागते. परंतु भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळत असतात. अती तातडीच्या मोजणीला दुप्पट पैसे भरूनही सहा सहा महिने वर्षभर वेळ लागत असेल तर लोकांना जास्त घेतलेले पैसे भूमी अभिलेख ने विनाअट मागारी द्यायला पाहिजेत. काही प्रकरणात मोजणी उद्या येणार आहे असा प्रोग्राम दाखवत असूनही कुठलीही नोटीस अथवा मोबाईल मेसेज किंवा माहिती मोजणीदारास अथवा लगतदारास दिली जात नाही. अनेक प्रकरणात दुसऱ्या दिवशी डिक्लेर असलेल्या  ऑनलाईन मोजणी प्रोग्राम ची माहिती स्वतः मोजणी ऑफिस जावलीलाच माहिती नसते इतका हलगर्जीपणा अधिकारी व कर्मचारी करीत असून त्यामुळे अनेकवेळा मोजणी प्रोग्राम खोटी कारणे देऊन परस्पर रद्द केले जात आहेत.
        याप्रसंगी रिपाई जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे व रिपाई महिला जिल्हा अध्यक्ष पुजाताई बनसोडे यांनी सातारा जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अधिकारी यांना सांगितले की अतितातडीची मोजणीची प्रकरणे तसेच मुदत संपलेली जी प्रकरणे आहेत ती ताबडतोब 10 एप्रिल च्या आत निकालात काढावी व  जावळीच्या जनतेला समजण्यासाठी गेलेवर्षभराची भूमी अभिलेख ने  केलेल्या कामाची माहिती ऑनलाईन अपलोड करावी  अन्यथा 15 एप्रिल ला भूमी अभिलेख सातारा व भूमी अभिलेख शाखा जावली च्या ऑफिस मध्ये मेंढरे सोडून ऑफिस समोर रिपाईच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल.
    याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात, बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!