महत्त्वाच्या बातम्या

जावळी गावच्या यात्रेनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

     गावच्या यात्रेच्या निमित्ताने जमलेल्या युवकांनी एकत्र येत काहीतरी विधायक काम हाथी घेऊन समाजासाठी योगदान दिले पाहिजेत या हेतूने मोरघर ता, जावळी गावच्या यात्रेच्या मुख्य दिवशी रक्तदान शिबिर घेऊन एक अनोखा उपक्रम केल्याने आजच्या तरुण पिढीपुढे एक आदर्श देऊ केला आहे. त्यामुळे परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    गावाकडे एकत्र येण्याचा वर्षातून एकच असा दिवस असतो तो म्हणजे यात्रा आणि तरुण वर्ग आजच्या काळात यात्रा म्हणजे एक मौज मजा करण्यासाठीचा दिवस म्हणून साजरा करताना आपण आज पाहत आहे.  मात्र मोरघर येथील युवकांनी समाजापुढे खऱ्या अर्थाने आदर्श देताना गावातीलच कामानिमित्त मुबंई, पुणे व इतर ठिकाणी  नोकरीं निमित्ताने असणाऱ्या बाहेर असणाऱ्या युवकांनी  वर्षातून एकदा आपण आपल्या गावी येत असतो त्यावेळी सर्व नवे जुने मित्र यांची भेट होत असते मात्र आपण भरमसाठ पॆसे खर्च करतो येतो व जातो मात्र सर्वांनी मिळून ठरवले कि काहीतरी करायचे  व दरवर्षी यात्रेला काहीतरी विधायक काम करायची यावर्षीपासून त्याची सुरुवात करायची हे ठरवून जगात कोणते दान सर्वश्रेष्ठ आहे, तर ते रक्तदान त्यामुळे रक्तदान शिबीर घेऊन आपण सुरुवात करायची असे ठरवून गावच्या युवक, युवतीनी एकत्र येत यात्रेच्या दिवशी जवळपास 61 जणांनी रक्तदान केले. 
   अक्षय ब्लड बँक सातारा सचिन साळुंखे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या यां शिबिरासाठी पूजा गायकवाड, सागर जाधव, दिव्या साबळे,साक्षी वैराट,विशाल खुडे,यश मोरे, तमन्ना शेख,सानिया पठाण यांनी सहकार्य केले. यावेळी अशा प्रकारे आपल्या गावच्या युवकांनी रक्तदान शिबीर घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिलांनी त्यांचे कौतुक केले.
        गावातील युवकांनी यात्रेच्या निमित्ताने केलेला हा उपक्रम खुप कौतुकास्पद असा आहे, दरवर्षी असे विधायक उपक्रम गावामध्ये झाले तर निश्चित गावामध्ये चांगली कामे देखील होऊ शकतात, त्याच्या प्रत्येक उपक्रमासाठी माझे सहकार्य राहील.
असे गावचे युवा नेते सुरेश (तात्या ) गायकवाड यांनी सांगितले 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!