सिडको कडून होणाऱ्या त्रासावर उपाययोजनेसाठी शिवसेनेची बैठक संपन्न
ठाणे : सिडको भवन येथे ठाणे लोकसभा खासदार मा.नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत व शिवसेना उपनेते मा.विजय नाहटा, जिल्हाप्रमुख श्री.द्वारकानाथ भोईर, व जिल्हाप्रमुख श्री.किशोर पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नागरिकांना सिडको कडुन होणारा त्रास व त्या सर्व गंभीर समस्या सोडवण्यात याव्या म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने सिडको ट्रान्स्फर, सिडको च्या घरांचे अचानक वाढवलेले दर कमी करणे, सिडकोने शासनाचा फ्री होल्ड केलेला GR ताबडतोब लागु करावा व पुनर्विकास तसेच अनेक विषयांवर सह-व्यवस्थापकिय संचालक मा.गणेश देशमुख यांच्या सोबत चर्चा झाली व या सर्व विषयांची ताबडतोब दखल घेऊन सोडवण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.यावेळी नवी मुंबईतील अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
