जुन्या भांडणाच्या कारणावरून म्हसवड येथे दोन गटात मारामारी ; परस्पर विरुद्ध तक्रार दाखल
माण तालुक्यातील म्हसवड येथील सुरेखा रामलिंग सुर्यवंशी यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या वादावरून दोन गटातील वादावादीतून म्हसवड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये परस्पर एकुण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निरंजन सोमनाथ साळुंखे (वय २३ रा. म्हसवड ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत संजय सुर्यवंशी , संदीप लक्ष्मण सुर्यवंशी , आदेश संदीप सुर्यवंशी , आदित्य संजय सुर्यवंशी (सर्व रा. म्हसवड ता. माण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी दुसऱ्या गटातील शोभा संदीप सुर्यवंशी (वय ३८, रा. मासाळटेक म्हसवड ता. माण ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निरंजन सोमनाथ साळुंखे , सुमित सोमनाथ साळुंखे , ओम धोंडीराम साळुंखे सर्व रा. म्हसवड तर उमेश कोरडे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निरंजन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ३ जून २०२५ रोजी स.१० वा म्हसवड येथे सुरेखा रामलिंग सुर्यवंशी यांचे घरासमोर जुन्या भांडणाच्या वादावरुन मोटार सायकलवर येवुन अनिकेत सुर्यवंशी , संदिप सुर्यवंशी , आदेश सुर्यवंशी , आदित्य सुर्यवंशी यांनी आपापसांत संगणमत करुन गंभीर दुखापत करुन शिवीगाळ , मारहाण करून व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रार निरंजन साळुंखे यांनी दिली आहे. याचप्रकरणी शोभा सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार दि. ३ जून २०२५ रोजी दुपारी 2 वा. शोभा सुर्यवंशी, अदित्य सुर्यवंशी , अनिकेत सुर्यवंशी हे घरासमोर उभे असताना म्हसवड पेठेत राहणारे निरंजन साळुंखे , सुमित साळुंखे, ओम साळुंखे, तसेच त्याचा पाव्हणा उमेश कोरडे यांनी तिथे येऊन शिवीगाळ , दमदाटी व मारहान केली आहे. अशी चार जणांविरुद्ध शोभा सुर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी पुढील तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एम एन हांगे , पोलिस हवालदार जे.डी लुबाळ करीत आहेत.
