महत्त्वाच्या बातम्या

“ठाकरे बंधू एकत्र येणार?” – मराठी माणसाची पुन्हा एक आशा

   राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येतील का? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाच्या मनात आहे. नुकतेच मुंबईत काही ठिकाणी लावलेले बॅनर या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आणत आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला असून, “ठाकरे बंधू एकत्र या” असे आवाहन करण्यात आले आहे.

 राज ठाकरे यांचा वेगळा मार्ग

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला 13 आमदार निवडून आले. सुरुवातीला पक्षाला मोठा जनाधार मिळाला, मात्र नंतर तो काहीसा कमी झाला.

 भावनिक साद अनेकदा घातली, पण…

गेल्या काही वर्षांत अनेकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः कार चालवत त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी या दोघांचे संबंध सुधारतील असे वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली?

सध्या मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. अशा वेळी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय आणि वैचारिक मतभेद अजूनही कायम आहेत. त्यामुळे ही भावनिक साद यशस्वी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 एकत्र येणार की वेगळ्याच मार्गाने जाणार?

या बॅनरमुळे चर्चेला उधाण आले असले तरी प्रत्यक्षात ठाकरे बंधू एकत्र येतील का, हे सांगता येणार नाही. सध्या दोन्ही नेत्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आगामी काळात या चर्चेचा पुढे काय परिणाम होतो. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!