महत्त्वाच्या बातम्या

शहाजी बापू पाटील यांचे खळबळजनक विधान – “एक दिवस आदित्य ठाकरेही उद्धव ठाकरेंना सोडतील!”

      शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी खळबळजनक विधान करत म्हटले की, “एक दिवस आदित्य ठाकरे हेच वडील उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील.” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक नेते शिंदे गटात सामील होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता थांबण्यात काही अर्थ नाही. परिस्थिती अशी आहे की भविष्यात उद्धव ठाकरेंनाही आदित्य ठाकरे सोडतील,” असेही ते म्हणाले.

      गुहाटी गटात सामील झालेल्या शहाजी बापूंना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पराभूत केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!