ठाण्याला ४८ वर्षांनंतर मिळाले सभापती पद; एपीएमसीमध्ये पहिले सभापती होते ठाणेकर
आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय ठाणे जिल्ह्यात आहे. एक महिन्यासाठी पहिले सभापतिपदही या जिल्ह्याला मिळाले होते; परंतु त्यानंतर तब्बल ४८ वर्षांनंतर ठाणे व कोकण विभागाला सभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे. नवी मुंबईमध्ये ७२ हेक्टर जमिनीवर वसलेल्या बाजार समितीमध्ये वर्षाला १० हजार कोटींची उलाढाल होते. बाजार समितीला १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यामुळे बाजार समितीचे संचालक व सभापती, उपसभापती होण्यामध्ये सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस असते.
बॅकलॉग भरून निघाल्याची जोरदार चर्चा
प्रभाकर ऊर्फ प्रभू पाटील यांची सभापती पदावर वर्णी लागली आहे. त्यांच्यामुळे कोकण व ठाणे जिल्ह्याचा बॅकलॉग भरून निघाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांच्या नियुक्तीमुळे पहिल्यांदा शिंदे सेनेचा सभापती झाला आहे.स्थापनेच्या एक
महिन्यानंतर पुन्हा ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळाले असून अनेक वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत निघाले आहे
