महत्त्वाच्या बातम्या

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; दिल्ली येथे कवी.महेंद्र सुर्यवंशी यांचा सत्कार

       २१ ते २३फेब्रुवारी २०२५ रोजी नुकताच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम, दिल्ली येथे पार पडले.या साहित्य संमेलनात कवी महेंद्र निवृत्ती सुर्यवंशी यांच्या ‘गेला निघून साजन’ ही कविता म्हणताच रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक रसिक ही कविता गुणगुणत आहे. कविता सादर केल्यानंतर कवी महेंद्र सुर्यवंशी यांना कवी, लेखक, राजन लाखे सर तसेच दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
      यावेळी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे उद्घाटक म्हणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तसेच स्वागताध्यक्ष मा.शरद पवार, प्रमुख पाहुणे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका मा.डॉ. तारा भवाळकर यांनी भूषवले. त्याचप्रमाणे महामंडळ अध्यक्षा प्रा.उषा तांबे , डॉ.नीलिमा गोऱ्हे , माजी केंद्रीय मंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण,मा.सुरेश प्रभू,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मा.सुप्रिया सुळे ही उपस्थित होत्या . समारोपाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे , मा.अजितदादा पवार , तसेच मराठी भाषा ,उद्योग मंत्री मा. उदय सामंत, लोकमत वृत्तपत्राचे प्रमुख राजेंद्र दर्डा असे सर्व राजकीय नेते ही उपस्थित होते.
      या वेळी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांची कवी महेंद्र सुर्यवंशी यांनी भेट घेतली असता त्यांनी खुप कौतुक केले. कवी महेंद्र निवृत्ती सुर्यवंशी  रा.मस्करवाडी, ता.कराड, जिल्हा. सातारा मधील ग्रामीण डोंगर भागातील कवी असुन सध्या बेलापूर येथील सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. महेंद्र सुर्यवंशी हे “पलपब पालघर उपाअध्यक्ष” व शब्दवेल पनवेल येठे सदस्य म्हणून साहित्य सेवा करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!