महत्त्वाच्या बातम्या

डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या माथेफिरूवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ फाशी द्या:किरण बगाडे

     26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिले. त्या संविधानामधून प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले.महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्योत कायम तेवत राहणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचार आणि संविधान रुपी चळवळ ही कायमस्वरूपी सक्षमपणे उभी आहे. मात्र अमृतसर मध्ये  काही जातीवाद्याकडून व समाजकंटकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची तोडफोड  करण्यात आली आहे. तरी त्या माथेफिरूच्या पाठीमागील मास्टरमाइंड कोण आहे.याचीही पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अनेक महापुरुषांच्या विचाराची व त्यांच्या प्रतिमेची विटंबना वारंवार होत आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या सदर अमृतसरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. लवकरच या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ फाशी द्या तसेच लोकसभेमध्ये महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी असा आदेश तात्काळ पारित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापकतथा पक्ष प्रमुख आयु. संजय (भैय्या) सोनवणे यांच्या आदेश आल्यावर लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश गायकवाड,  जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे,संतोष चव्हाण सातारा युवक अध्यक्ष राहुल माने, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!