महत्त्वाच्या बातम्या

डॉ. दत्तात्रय कोरडे यांना मराठवाडा इतिहास परिषदेकडून उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक 

    छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जानेवारी 2024 मध्ये मराठवाडा इतिहास परिषद झाली होती.यामध्ये  43 व्या अधिवेशनात छ्त्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाचे प्रा.डॉ.दत्तात्रय कोरडे यांनी सादर केलेल्या ‘पेशवेकालीन वाई शहराचा सांस्कृतिक इतिहास’ या  शोध निबंधास  मराठवाडा इतिहास परिषदेने उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून पारितोषिक देऊन गौरव केला. यावर्षीचे मराठवाडा इतिहास परिषदेचे 44 वे अधिवेशन आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर या ठिकाणी दि . 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात या पारितोषिकाचे वितरण गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे व डॉ. संतोष बनसोड संचालक अमरावती विद्यापीठ अमरावती आणि डॉ. विकास बाबा आमटे सचिव महारोगी सेवा संस्था वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

      त्यावेळी या कार्यक्रमास मराठवाडा इतिहास परिषदेचे कार्यकारी संपादक डॉ. सोमनाथ रोडे,अध्यक्ष प्राचार्य डॉ. नारायण सूर्यवंशी व सचिव डॉ. नितीन बावळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी  रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. धनाजी मासाळ, तसेच डॉ. मनोहर निकम, डॉ. महादेव चिदे व योगेश यादव हेही उपस्थित होते. इतिहास विभागातील डॉ. विकास येलमार, डॉ. सीमा कदम, प्रा. कबीर वाघमारे, प्रा. शरद ठोकळे, प्रा. निलेश जमदाडे व प्रा. राजू लोखंडे या सर्वांनी अभिनंदन केले. याशिवाय रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख व सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!