महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असून १६ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत आक्षेप नोंदवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे. 

      प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर  परिक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येईल. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. 

      विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या  आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!