डॉ.भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणग्रस्तांचा मेळावा.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना नदी आणि या नदीवर असणारे कोयना धरण पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करते. परंतु आज या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांची शेती, घरे पाण्याखाली गेली आहेत त्यांना शासनाने अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही. तसेच त्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही. अशांना न्याय मिळवून देण्याचे काम श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर करत आहेत.
त्यानुषंगाने डॉ.भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जावली, महाबळेश्वर तालुक्यातील व इतर तालुक्यातील कोयना धरणग्रस्ताच्या प्रमुख कार्याकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी बोलताना डॉ.भारत पाटणकर यांनी ज्या लोकांनी जमीनी पसंत केल्या आहेत, त्याचे 7/12 तात्काळ होण्याबाबत तसेच जमीन पसंती करण्यासाठी शिल्लक असलेल्या लोकांना पसंतीच्या तारखा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही धरणग्रस्तांच्या अडचणीबाबत श्री.प्रकाश साळुंखे, अध्यक्ष कोयना धरणग्रस्त संघटना यांनी आपल्या व्यथा मांडल्या. तसेच त्याबाबत डॉ.पाटणकर यांनी अडचणी वर मार्गदर्शन केले. त्यावेळी जावली, महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव तसेच रायगड, ठाणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व इतर कोयना धरणग्रस्त उपस्थित होते.
