राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर
काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर होते. ते कौटुंबिक कारणासाठी पुण्याहून महाबळेश्वरला रवाना झाले.डॉ. रायान बनाजी यांच्या घरी भेट देण्यासाठी ते आले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता त्यामुळे ते कोणत्याही कार्यकर्त्यांना भेटले नाहीत.दि 15 रोजी ते दिल्लीहून पुण्यात आले व पुण्यात रात्री मुक्काम केल्या नंतर आज सकाळी ते 9.30 च्या दरम्यान महाबळेश्वर मध्ये पाहोचले. राहुल गांधी व डॉ. रायान बनाजी यांच्यात कौटुंबिक संबंध होते.
रायन बनाजी यांचे काही दिवसांपूर्वी पोर्तुगालची राजधानी लिसबन येथे हृदयविकाराने निधन झाले होते. आज त्यांचे पार्थिव महाबळेश्वर येथे त्यांच्या निवास स्थानी आणण्यात आले.ते पारशी होते. त्यांच्यावर पारशी धर्मातील विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील वर्षी राहुल गांधी यांनी रायान बनाजी यांच्याकडेच डोळ्यांची तपासणी केली होती.राहुल गांधी यांचे कौटुंबिक संबंध असल्याने आज सांत्वन पर भेटीसाठी ते महाबळेश्वर येथे आले होते.
