ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश
पंजाब पोलिसांनी रविवारी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचे भांडे फोडले आहे. पोलीस महानिर्देशक गौरव यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार एसएसओसी अमृतसर ने सीमेपलीकडून होणाऱ्या मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीकडुन ६ किलो हिरोईन , ६७ जिवंत काडतुसे , २ मॅगझीन , ६ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
सर्वेक्षणादरम्यान हाती आलेल्या माहिती नुसार पंजाब मधील सुमारे 15.5% लोकसंख्येपैकी 3 दशलक्ष लोक ड्रग्स घेतात, तर 2 दशलक्षाहून अधिक लोक दारूचे सेवन करतात. राज्यातील अशा परिस्थितीमध्येच पंजाब पोलिसांनी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश केला.सीमेपलीकडून केली जाणारी ड्रग्स तस्करीची ही पाहिलीच वेळ नसून अनेकदा मादक पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. या आधी जुलै महिन्यात सुद्धा एनडीपीएस च्या टीमने सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केले होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार टोळीच्या विरुद्ध एनडीपीएस अधिनियमा अंतर्गत एफ आय आर दाखल केली आहे, आणि आरोपीना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. शोध मोहिमेत मोठ्या नेटवर्कचा खुलासा होण्याची शक्यता आहे. मध्यसीमेपलीकडील मादक पदार्थांच्या तस्करीवर मोठा प्रहार करता अमृतसर पोलीस कमिशनरने 3 ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपीना अटक केली आहे. ज्यामध्ये एक मोठा आरोपी सुद्धा सामील आहे.
पोलिसांनी 1 किलो आईस ड्रग , 2.45 किलो हिरोईन आणि 520 ग्रॅम प्रीकर्सर केमिकल स्यूडोएफेडरिन सुद्धा जप्त केले. यामध्ये गुरबक्स उर्फ लाला यास अटक करण्यात आली असून त्याच्या कडील 1 किलो आईस (मेथामफेटामाइन) , 2.45 किलो हिरोईन आणि 520 ग्रॅम स्यूडोएफेडरिन जप्त केले. ड्रग्स तस्करी करणारा गुरबक्स हा प्रीकर्सर केमिकल चे सप्लाय करत होता याचा उपयोग कच्ची हिरोईन मध्ये मिसळून त्याचा असर वाढवन्याकरिता केला जातो.
आरोपी लाला यास प्रत्येकी 50,000 रुपयांचे कमिशन मिळत होते. गुरबक्स उर्फ लाला सोबत अन्य दोन आरोपी समोर आले आहेत. त्यांची नावे दलजीत कौर आणि अर्षदीप अशी आहेत. जे दोघे छेहरठा चे रहिवासी आहेत.
