ड्रेनेजच्या चेंबरची सिमेंट झाकणे गायब झाल्याने पुणे बंगलोर महामार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण
पुणे बंगलूर महामार्गावर असणाऱ्या दुभाजकात ड्रेनेजची पाईप लाईन टाकली आहे. ठिकठिकाणी दुभाजकात चेंबर टाकले आहेत मात्र या ड्रेनेजच्या चेंबरची सिमेंट झाकणे गायब झाल्याने महामार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गाच्या सहापदरीकरण कामात अनेक त्रुटी राहिल्याने कायमच गंम्भीर घटना घडू लागल्या आहेत. रायगावं फाट्यापासून आनेवाडी पर्यन्त असणाऱ्या सेवा रस्ता व मुख्य महामार्गयामध्ये पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज पाईप लाईन टाकल्या आहेत. त्यात पाणी कमी आणि कचरा जास्त अशी परिस्थिती बनली आहे. अडकलेला कचरा घाण काढण्यासाठी ठिक ठिकाणी पाच ते दहा फुटाचे चेंबर टाकले आहेत, मात्र गेली अनेक वर्षे या चेंबर वरील झाकनेच गायब झाल्याने मोठी धोक्याची परिस्थिती बनली आहे. हे चेंबर जवळपास दहा फूट खोल असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकून तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच येत असते. परिणामी आजूबाजुच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत असते. रात्रीच्या वेळी हे चेंबर दिसत नाहीत. आजूबाजूला असलेले शेतकरी शेतातून परतत असताना महामार्ग ओलांडून जा ये करत असतात. रात्रीच्या वेळी चेंबर न दिसल्याने अनेक महिला देखील या उघड्या चेंबरमध्ये पडून गभीर जखमी झाल्या आहेत ,तर अनेकदा यामध्ये लहान जणांवरे देखील पडली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात अनेक लहान मोठे उधोग व्यवसाय सुरू झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते त्यात पथदिवे नसल्याने अंधार देखील कायम असतो.
कोणत्याही पद्धतीचे नियोजन न करता केलेले महामार्गाचे चुकीच्या कामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना,आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, व लगतच्या ग्रामस्थांना व प्रवाशांना बसत आहे. महामार्गावर अशा काही त्रुटी आहेत, त्याची योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही आम्ही आंदोलन करू असा इशारा जावळी तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शुभम मोहिते,युवा नेते राहुल माने, पोलीस पाटील धनंजय माने,अभिजित दुदुस्कर, नीलेश गायकवाड,अरुण ढवळे,मुन्ना मुसळे,सोन्या पवार,यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. अनेकदा रायगावं फाट्यावरील असणाऱ्या समस्याचे निवेदन सबंधित अधिकारी टोल नाका व्यवस्थापन यांना ग्रामस्थांनी दिले आहे. मात्र हे अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ वाढत आहे. त्यामुळे लोकांची ये-जा वाढली आहे.सबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर मार्ग काढावा.
महामार्गावरील या गंभीर समस्या गेली अनेक वर्षे जैसे थे आहेत. यामध्ये सबंधित अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असतील तर आम्ही येथे मोठे जणआंदोलन करू,प्रसंगी रस्ता रोको देखील करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिन्द्र मुळीक यांनी दिला आहे.
