महत्त्वाच्या बातम्या

दंतेवाड्यात चकमकीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; जहाल नक्षलवादी मुरलीला कंठस्नान; सुरक्षा दलाची कारवाई

     गडचिरोली: सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात आली असून दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटर पथकाने ३ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत नक्षल नेते सुधीर उर्फ मुरलीचा खात्मा झाल्याची माहिती आहे. नक्षलवादी मुरलीवर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटरच्या टीमने अभियानावर असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांवर कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी, नक्षल आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत 25 लाख इनामी नक्षलनेता सुधीर उर्फ मुरली याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.तर अन्य दोन नक्षलवाद्याची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असून आताही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. 
       चकमकी दरम्यान INSAS रायफल 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बस्तर क्षेत्रात 2025 मध्ये विविध चकमकीत 100 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सोनासाई उर्फ मुरली हा मूळचा तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. अहेरी दलममध्ये १९९५ ते १९९७ पर्यंत त्याने काम केले, त्यानंतर १९९७ ते १९९९ पर्यंत तो पेरिमिली दलममध्ये सक्रिय होता. पुढे त्याने गडचिरोली जिल्हा सोडला व आपला मुक्काम अबुजमाडमध्ये हलविला. तेथून त्याने हिंसक कारवाया केल्या. सुरुवातीला तो चळवळीत नवीन भरती झालेल्या सदस्यांना प्रशिक्षण देत असे, त्याच दरम्यान त्यास डीव्हीसीएम म्हणून बढती मिळाली. मात्र, एका महिला नक्षल्याच्या तक्रारीनंतर त्यास पदावनत केले. त्यानंतर तो इंद्रावती क्षेत्रात एसीएम म्हणून काम करत राहिला. सध्या तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!