दहिवडीत सोमवारी फळे व भाजीपाला बाजाराचा शुभारंभ
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दहिवडी येथे फळे व भाजीपाला बाजाराचा शुभारंभ सोमवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ९ वाजता सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती सभापती विलासराव देशमुख यांनी दिली. दहिवडी येथे फळे व भाजीपाला बाजार सुरु झाल्यामुळे शेतकरी बांधवांना तालुक्यातच विक्रीची सोय होऊन वाहतुक खर्च कमी होणार आहे. बाजार भावाप्रमाणे शेतमालाची विक्री व खरेदी करण्यात येणार आहे. लिलावानंतर शेतमालाची रक्कम शेतकऱ्यांना रोख दिली जाईल. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा उपलब्ध असणार आहे. बाजार समितीकडून आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तरी माण तालुक्यातील तसेच परिसरातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समिती मुख्यालय दहिवडी येथे विक्रीसाठी आणावा. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचा सर्व शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशाली विरकर, सचिव अमोल कट्टे, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद माण तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती दहिवडी यांनी केले आहे.
