दहिवडी आगारला नवीन दहा बसेस
दहिवडी आगारात एकाचवेळेस नव्या कोऱ्या दहा बस दाखल होणं हा आगारासाठी तसेच प्रवाशांसाठी सुवर्णक्षण आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी व सिध्दनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांनी केले.
या नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, दहिवडीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, प्रताप भोसले, नंदकुमार खोत, महेश कदम, रवी तुपे, विभागीय यंत्र अभियंता विकास माने, आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, विभागीय उप यंत्र अभियंता भूषण सुर्यवंशी, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक महेश गोंजारी व जगदीश लोंढे, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हणमंत फडतरे, वाहतूक निरीक्षक बाबूराव खाडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे, वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे, विजय पोळ, सुरेश भोजणे, गजानन शिंदे, कादर शिकलगार, शिवाजी खाडे, सुरेश दळवी, वरिष्ठ लिपिक दादा खाडे, अमोल शेंडे, संतोष शिंदे, संदीप काळे, स्वप्नील माने आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनिया गोरे म्हणाल्या, मागील वर्षांपासून या आगाराने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. मी स्वतः येथे वृक्षारोपण केले आहे. येथे झालेल्या चांगल्या कामाचा परिणाम म्हणून आगाराने स्वच्छ, सुंदर आगार स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून दहा लाखाचे बक्षिस सुध्दा मिळवले आहे. या आगारात बसेसची दुरावस्था होती तसेच नवीन बसेसची वारंवार मागणी होत होती. हे लक्षात घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दहा बस मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून अजून किमान पाच बसेसची आपली मागणी आहे.
अरुण गोरे म्हणाले, एकाचवेळेस एवढ्या नवीन बस मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बसेसमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळून प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. संतोष बोराटे यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील काही वर्षात सुरु असलेल्या आगाराच्या वाटचालीचा ऊहापोह करुन लोकप्रतिनिधी, जनता व माध्यमांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.लालासाहेब ढवाण यांनी सुत्रसंचालन केले तर अमोल शेंडे यांनी आभार मानले.
लवकरच दहिवडीत साकारणार अद्यावत बसस्थानक
‘१९७६ साली हे बसस्थानक लोकांच्या सेवेत दाखल झाले. ही इमारत जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. त्यामुळे नवीन बसस्थानकासाठी ४० कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच हा निधी उपलब्ध होऊन अद्यावत व दिमाखदार अशी दहिवडी शहराच्या वैभवात भर घालणारी इमारत येथे आकारास येईल.” सोनिया गोरे.
