दुहेरी बॅडमिंटनमध्ये सुशांत – देवांश प्रथम
दहिवडी: क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेत मुलांच्या गटात सुशांत रासकर व देवांश दडस या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुलींमध्ये स्वरा अवघडे व श्रुती जाधव विजेत्या ठरल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय माण व जी. जी. स्पोर्टस् अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दहिवडीत बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा- २०२५ आयोजित केल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांच्या हस्ते व तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, दिनेश दवे, पत्रकार रूपेश कदम, अॅड. सौरभढोक, विजय ढोक, धनंजय जाधव, गणेश गोरे यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सुशांत रासकर व देवांश दडस या जोडीने पटकाविला, तर समर्थ देवकुळे व ओम गंबरे, अवधूत गायकवाड व रुद्र खाडे आणि वेदांत काटकर व आदित्य गोसावी यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक स्वरा अवघडे व श्रुती जाधव तर द्वितीय क्रमांक ओवी शिंदे व स्वरा जाधव यांनी मिळविला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, बाळासाहेब सावंत, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, विजय काटकर यांनी अभिनंदन केले.
