धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणं भोवलं ! बीडच्या पालक मंत्री पदी अजितदादा पवार
राज्याचे पालकमंत्री कधी घोषित होणार याची चर्चा सुरु असतानाच आता राज्याच्या पालक मंत्रीपदाच्या निवडी जाहीर होऊन तशी नुकतीच घोषणा झाली, त्यानुसार सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शंभूराजे देसाई यांची तर लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवेंद्रसिहराजे भोसले यांची निवड झाली आहे तर बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी मकरंद पाटील यांची निवड झाली मात्र सर्वात मोठी बातमी म्हणजे बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं मृत्यू प्रकरण मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांचे आणि धनजंय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यानं मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत होती. त्यामुळंच बीडच्या पालकमंत्रीपदाला त्यांना मुकावं लागलं आहे.
