महत्त्वाच्या बातम्या

सातारच्या पालकमंत्री पदी आ.शंभूराज देसाई

     केबिनेट मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर सातारच्या  पालकमंत्री पदी आमदार  शिवेंद्रराजे भोसले यांची निवड होणार अशी चर्चा सर्वत्र होती.परंतु शिवेंद्रराजे भोसले यांचे लातूर जिल्हा पालकमंत्री नाव जाहीर झाल्याने या चर्चेवर पडदा पडला.
     सातारा जिल्ह्यात यावेळी महायुतीने आठही मतदार संघात बाजी मारली व चार कॅबिनेट मंत्री पदे मिळवून नवा इतिहास रचला होता.परंतु सगळ्यांना धाकधुक होती ती पालक मंत्री पदाची. सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे सर्वांचे लक्ष पालक मंत्री पद कोणाला मिळणार याकडे लागून होते. आज राज्याच्या पालक मंत्री पदाची यादी जाहीर झाली असुन सातारचे पालक मंत्री म्हणून आ.शंभूराज देसाई यांची नियुक्ती झाली आहे. यापुर्वीही शंभूराज देसाई यांनी मंत्री पद व पालकमंत्री पद भूषवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!