महत्त्वाच्या बातम्या

धोम उजवा कालवा ओव्हर लोड झाल्याने फुटण्याची स्थिती 

   सायगाव,रायगाव, महामुलकरवाडी, आनेवाडी हद्दीतून जाणाऱ्या धोम पाटबंधारे उजव्या कालव्यात ओव्हरलोड पाणी चालू असल्याने कठोकाठ भरलेल्या कालव्यामधून पाणी बाहेर पडून कालवा फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे,तरीही सबंधित विभागाचे अधिकारी मात्र सुस्तवले असल्याचे दिसत आहे. पुणे बंगलोर महामार्गवरून महामुलकरवाडी ता जावळी येथे जाताना जवळपास दोन किलोमीटर अंतर कालवा ओव्हर फ्लो वाहू लागला आहे, अगदी कठोकाठ भरून वाहू लागल्याने कालव्यातून पाणी बाहेर येत आहे त्यामुळे कालवा फुटण्याची चिन्हे आहेत,अनेकदा असे प्रकार होत असल्याने आजूबाजूचे शेतकरी हैरान झाले आहेत. जर कालवा फुटीचा प्रकार झाल्यास ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होणारच आहे पण पाणी कालवा दुरुस्ती होईपर्यंत शेतीला पाणी देखील मिळणार नाही,अंत्यँत निष्काळजीपणे येथील विभागाचे अधिकारी कोणत्याही परिणामाची काळजी  करत नाहीत,या कालव्यात आशा प्रकारे मोठ्या प्रमानात ओव्हरफ्लो पाणी नेहमी होत असते, अनेकदा पाणी बाजूच्या रस्त्यावर देखील आले होते मात्र तरीही याकडे लक्ष दिले जात नाही. 

     कालव्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असतो मोठं मोठी झाडे देखील पडलेली असतात, मात्र ती तशीच असतात, लिंब हद्दीत तर अनेक ठिकाणी  कालव्यात मोठं मोठे दगड धोंडे पडले असून त्यामुळे पाण्याच्या फुगवटा निर्माण होऊन पाठीमागे कालव्याबाहेर पाणी येऊ लागले आहे.  एक तर या परिसरातील शेतकऱ्यांना अनेक संकटे आहेत आणि जर आशा प्रकारे कालवा फुटण्याच्या घटना घडल्या तर मोठे संकट उभे राहणार आहे, वेळीच यांसबंधी ठोस उपाय योजना करण्यात यावी. तसेच कालव्यात पडलेले मोठं मोठे,दगड, कचरा हटविण्यात यावे अशी मागणी येथील शेतकरी  समाधान गायकवाड,बाबा साळेकर, सुनील क्षीरसागर,दिलीप राजुगडे, शँकर कदम, बाबू दुटाळ,बाबू वारागडे, जितेंद्र कदम यांनी केली आहे,

    अनेक वेळा आम्ही सबंधित विभागाला यांसबंधी माहिती देत आहोत मात्र यांचे लक्ष फक्त कुणाच्या मोटरी चालू बंद करता येतील याकडेच लक्ष आहे, अजून तरी या ठिकाणी कालवा फुटी झाली नाही मात्र झाल्यास शेतीचे फार मोठे  नुकसान होणार आहे, त्यामुळे या विभागाने वेळीच लक्ष ध्यावे अन्यथा आम्हांला आंदोलन करावे लागेल असे रायगाव विकास सोसायटीचे संचालक उमेश तोडरमल म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!