महत्त्वाच्या बातम्या

नवले ब्रिज जवळ ट्रकचा भीषण अपघात; एका पाठोपाठ अनेक गाडयांना दिली धडक

     राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून आज पुणे 
शहरातील नवले ब्रीजजवळ काही वेळापूर्वी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रजहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात अनेक गाडयांना धडक बसली असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
     मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढील वाहनांना जोरात धडक दिली. ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता असे देखील सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर सदर परिसरात  खूप वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी रवाना झाले व वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पुढील तपास सुरु असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!