नवी मुंबई: घणसोली सेंट्रल पार्क येथे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत बीज संकलन केंद्र सुरु
नवी मुंबई: घणसोली ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घणसोली सेंट्रल पार्क येथे बीज संकलन केंद्र सुरु .माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असून यामध्ये अधिक भर घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
याअनुषंगाने निसर्ग उद्यान, सेक्टर ३ घणसोली सेंट्रल पार्क येथे बीज संकलन केंद्र सुरु करण्यात आले असून आपण घरी वेगवेगळी फळे आणतो, ती खाऊन झाल्यानंतर त्याच्या बिया संकलीत करुन घणसोली येथील सेंट्रल पार्क मध्ये जमा करा जेणेकरून उद्यान विभागामार्फत बिजांपासून रोपे तयार करण्यासाठी करेल.
