ना.जयकुमार गोरेंनी महिलेस पाठवले स्वतःचे अश्लील फोटो
महाराष्ट्र राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. वाल्मिक कराड प्रकरण, स्वारगेट बलात्कार प्रकरण या प्रकरणा बरोबर आज राज्याला पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती विश्वासू नामदार जयकुमार गोरे त्यांच्यावर एका महिलेने मला ना गोरे यांनी त्यांचे अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यासंबंधी ची तक्रार तीने राज्यपालांना केली आहे.
विरोधी पक्ष या प्रकरणात आक्रमक झाला असून खा. संजय राऊत यांनी अशा मंत्र्यांना लाथा मारून मंत्रालया बाहेर काढले पाहिजे अशी घणघाती टीका केली. या प्रकरणात बोलताना ना. गोरे यांनी सदर प्रकरण मला बदनाम करण्यासाठी रचल्याचे सांगितले आहे. २०१६ साठी या प्रकरणात ना. गोरे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. सदर प्रकरणाची चर्चा झाली नाही. सदर महिलेस पुन्हा धमकीचे फोन येणे सुरु झाल्याने जीविताला धोका होण्याची शक्यता असल्याने तिने शासनाकडे न्याय मागितला आहे.संबंधित महिलाही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातली असल्याची समजते.
प्रकरणातील तथ्य ही न्यायव्यवस्था पडताळेल परंतू कालच जनमत रेटयाच्यापुढे नमते घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी यांना पदावरून पाय उतार केले. या घटनेस काही कालावधी होण्याच्या आतच दुसऱ्या गंभीर प्रसंगास मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू असलेले नामदार जयकुमार गोरे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्र जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये 2019 साली न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केल्याचे ना.गोरे यांनी सांगितले आहे.
