महत्त्वाच्या बातम्या

पुणे बंगळूर महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग 

      पूणे बंगलोर महामार्गावरील वीरमाडे गावच्या हद्दीत मुंबईहुन पाटणकडे जाणाऱ्या स्लीपर कोच लकझरी बसला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागुन  बस जळाल्याने बसचे जवळपास ५ लाखाचे नुकसान झाले आहे. बसला आग लागल्याचे समजताच ड्रायव्हरने वेळीच बस सर्व्हिसरोडवर घेत बसमधील प्रवाशी आय आय टीचे विद्यार्थ्यांना उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.   याबाबत अधिक माहिती अशी कि MH 48 CQ 3073 या क्रमांकाची स्लीपर कोच लकझरी या बसचे चालक महंमद शेख मुबंई नालासोपारा येथून पाटणकडे आय आय टी मधील विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. सकाळी ८ वाजून ५० मिनीटांनी आनेवाडी टोलनाक्याजवळ वीरमाडे गावच्या हद्दीतुन जात असताना भारत पेट्रोलियम पंपाजवळ बसच्या पाठीमागील बाजूस शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात  येताच ड्रॉयव्हरने बस महामार्गावरून सर्व्हिस रोडवर घेवून थांबवली. व तात्काळ बसमधील 32 विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरवले.बसमधील विद्यार्थ्यांना खाली उतरवल्या नंतर बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला. दरम्यान आगीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व भुईंज पोलिसांनी तात्काळ आगीची माहिती सातारा व वाई अग्निशमन विभागाला दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाच्या गाड्या अपघात स्थळी पोहचून आग विझविण्यास सुरवात केली. व अर्ध्यातासात आग विझवली. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महामार्ग पोलिसांनी वेळीच उपस्थित होऊन परिस्थिती आटोक्यात आनल्याने होणारा मोठा अनर्थ टाळला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास स. फौ. दत्तात्रय शिंदे व ए एस आय राजे करत आहेत.

 नशीब बलवत्तर म्हणून…
      32 विध्यार्थी या बस मधून प्रवास करत होते,आग लागल्याचे समजताच चालकाने बस सेवा रस्त्यावर घेतली व फक्त पाचच मिनिटात आपले सर्व साहित्य घेऊन हे विद्यार्थी खाली उतरले. जर बस दरवाजा ऊघडता आला नसता तर नक्कीच गभीर प्रकार घडू शकला असता. सुदैवाणे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
    यावेळी बसने अचानक पेट घेतल्याने बस मध्ये असणारे विध्यार्थी खुप घाबरलेल्या अवस्थेत होते मात्र भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे व पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी त्यांची भेट घेऊन शांत केले, दुसऱ्या बसने पाटणकडे रवाना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!