महत्त्वाच्या बातम्या

निलम ढेबे हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

 

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल, राजवाडा सातारा येथे शिक्षणास सुरुवात केली. तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी त्यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन तालुका व जिल्हा स्तरावर करण्यात येते. महाबळेश्वर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील विद्यार्थीनी निलम सुनिल ढेबे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. निलमने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर विचार मांडले होते .तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. 

 

शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे यांचे तिला मार्गदर्शन लाभले होते. केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, विस्तार अधिकारी नामदेव धनावडे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,गटविकास अधिकारी यशवंत भांड तसेच संतोष जाधव, संपत जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिबा चव्हाण, कोंडीबा जाधव, संतोष मोरे यांनी या यशाबद्दल निलमचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!