महायुती भाजपचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांचा कराड उत्तर मतदार संघात गाव भेट दौरा
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदार संघातुन अर्ज दाखल केले आहेत. विधासनभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे गावोगावी दौरे सुरु झाले आहेत.
कराड उत्तर महायुतीचे भाजपचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांनी प्रचाराचा नारळी फोडला आहे. घोरपडे यांनी अपशिंगे येथून गावभेट दौऱ्याचा शुभारंभ केला. नांदगाव,खोजेवाडी,अपशिंगे,आंबेवाडी,खोडद,निसराळे,वारणानगर,तुकाईवाडी,सायळी,वेणेगाव येथे जाऊन सर्व कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केले तसेच गावातील समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन मनोज घोरपडे यांनी ग्रामस्थांना दिले.
