महत्त्वाच्या बातम्या

नेतृत्व निर्मिती ची ताकद तरुणाईत – प्रकल्प समन्वयक-राजेश्वरी मंडगे 

      सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी विकास मंडळ संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्र, पुणे यांच्या समन्वयातून “अग्रदूत” नेतृत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. प्रारंभी सर्व मार्गदर्शक प्रशिक्षकांचे प्राचार्य डॉ. हणमंत जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
     यावेळी प्रमुख मार्गदर्शक अग्रदूत पुणे जिल्हा समन्वयक राजेश्वरी मंडगे या विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या, नेतृत्व निर्मितीची ताकद तरुणाईत आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा अग्रदूत कसा व कोणत्या क्षेत्रात काम करतो याची विस्तृतपणे माहिती दिली. आशय समन्वयक संकेत भंडारे यांनी विद्यार्थ्यांमधील विकसित होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात कोणते सुप्त गुण असावेत, नेतृत्व करण्याची क्षमता विकसित होण्यासाठी प्रकल्प हाती घेतल्यावर गटचर्चा, गटकार्याचे महत्व आणि उद्देश पूर्तता यासाठी कसे काम करावे याबद्दल संवाद प्रश्न उत्तर रुपी मार्गदर्शन केले.

    समन्वयक सूरज पाल व यश देवाळकर यांनी विविध कृतीकार्यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेतला.या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालय स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख प्रा. अमीर इनामदार यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. सुचेता मोरे यांनी आभार प्रकट केले. यावेळी सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त व कृतीपूर्ण सहभाग घेत अग्रदूत नेतृत्व शिबिराचा पहिला टप्पा पूर्ण केला.यावेळी प्रा. डॉ. प्रतिभा पाटणे, प्रा. सीमा पवार, प्रा.निकिता पवार, प्रा. प्रतीक्षा माने, प्रा. शर्मिला सावंत, प्रा. अस्मिता येवले, प्रा. प्राची गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच  धनंजय गायकवाड, हणमंत यादव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!