महत्त्वाच्या बातम्या

परतीच्या प्रवासासाठी लोकांची गर्दी….वाहतूक सुरळीत होण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा…प्रवाशांची मागणी

 

दिवाळीच्या सलग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर पुणे मुंबई येथील चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असल्याने सातारा आगारात प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत आहे.सातारा आगार प्रमुखांनी ज्यादा बसेस सोडलेल्या आहेत परंतु प्रवाशांची गर्दी बघता सदर बसेस कमी पडत आहेत. त्यामुळे खाजगी बस चालकांचे उखळ पांढरे झाले आहे.काल रात्री सातारा आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच प्रवासी  व खाजगी वाहन चालक यांनी प्रचंड गर्दी केली होती .तसेच खाजगी बस चालक एसटी स्टँड मधून प्रवाशांना प्रलोभन दाखवत आपल्या वाहनातून प्रवास करण्यास गळ घालत होते. यावेळी एसटी प्रशासनाचा एकही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. तसेच सातारा आगारामध्ये झालेल्या निकृष्ट काँक्रीटमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून व अनेक  नादुरुस्त बसेस अनेक दिवसांपासून एकाच जागी बाहेर पडण्याच्या मार्गावर उभ्या असल्यामुळे बसेस व्यवस्थित पार्किंग होत नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसतो. भविष्यात एखादा अपघात होणारी शक्यता नाकारता येत नाही. तरी गर्दीच्या वेळी एसटी प्रशासनाने खाजगी वाहतुकीस आळा घालण्यासाठी व  आगारांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एखाद्या कर्मचारी नियुक्ती करावी. अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!