पाटण मध्ये दुचाकी आणि चार चाकीचा भीषण अपघात ; एक जण जागीच ठार
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकी चालक राहुल पवार जागीच ठार झाले आहेत. राहुल पवार हे सैदापुर येथील रहिवासी असून यांचा कन्ट्रक्शन व्यावसाय आहे. सातारा शहरात एस टी स्टॅन्डजवळ असणाऱ्या छत्रपती शाहू स्टेडियम येथील AK स्वीमिंग पूल च्या व्यवस्थापिका सौ.नीलम पवार यांचे ते पती होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास पाटण तालुक्यातील गुजरवाडी येथे हा अपघात झाला. वाहनांचा वेग जास्त असल्याने या अपघातात राहुल पवार यांचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून मृतदेह पाटणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
