महत्त्वाच्या बातम्या

टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत खेड च्या बाप लेकीचा मृत्यू

साताऱ्यातील नागठाणे येथे भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. दुपारी 4.30 च्या सुमारास मौजे नागठाणे गावच्या हद्दीतील NH 48 च्या लेनवर ही घटना घडली असून इब्राहिम हसन शेख (वय 38) व मेहेक इब्राहिम शेख वय 12 अशी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही जवुळके खु. रेटवडी, ता खेड, जि पुणे येथील रहिवासी होते.
       मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे गावच्या हद्दीतील कराडकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या NH 4 या महामार्गावर दुपारी 4.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. NH 48 च्या लेन वर टाटा टेम्पो (क्र MH 12 GT 9089) चालकाच्या रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून निव्वळ निष्काळजी पणामुळे समोर आलेल्या मोटार सायकल ला धडक दिल्याने हा अपघात झाला. आसिफ नैमुद्दीन सय्यद वय 30 वर्षे असे  टेम्पो चालकाचे नाव असून तो हडपसर पुणे येथील रहिवासी आहे. टेम्पो  चालकावर बोरगाव पोलिस स्टेशन मध्ये   भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106 (1), 281 मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत  गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!