पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी लोकांच्या आग्रहाखातीर बोटिंगची मुदत तीन दिवस वाढवली
महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा व पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 दौलतनगर येथे 15 एप्रिल पासून सुरू असलेल्या महोत्सवाला लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कोयला दौलत डोंगरी महोत्सव 2025 पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत सांगवड येथे कोयना नदीपात्रामध्ये बोटिंगची सोय ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध केले आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेचा बोटिंगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लोक जलक्रीडा आनंद घेत आहेत काही लोकांना त्याचे तिकीट मिळत नाहीत. पर्यटकांनी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्याकडे विंनती केली की बोटिंगला मुदत वाढवून द्यावी. लोकांच्या आग्रहाखातील बोटिंगची 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस मुदत वाढवण्यात आली आहे.
