मानखुर्द महाराष्ट्र नगर वार्ड क्रमांक 143 मधील कामा संदर्भात एम वार्ड पूर्व देवनार नवनियुक्त सहाय्यक आयुक्त श्री उज्वल इंगोले यांची भेट
शिवसेना उपनेते, लोकसभा गटनेते, दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा संपर्कप्रमुख, मा.राहुल शेवाळे व जिल्हा नियोजन समिती सदस्य दक्षिण मध्य मुंबई लोकसभा महिला संपर्कप्रमुख, मा.नगरसेविका सौ.कामिनी राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एम पूर्व देवनार नवनियुक्त सहाय्यक आयुक्त उज्ज्वलजी इंगोले भेट घेतली. तसेच वार्ड क्रमांक १४३ मधल्या कामा संदर्भात चर्चा करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र नगर मधील समस्या मांडण्यात आल्या. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा विषय, शौचालयाच्या समस्याबाबत, एन ए डी नाल्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र नगरमध्ये होणाऱ्या प्रदूषणाबद्दलही बोलणे झाले. महाराष्ट्र नगर मध्ये सबवे जे पावसाळ्यामध्ये पाणी साचत त्याच्याबद्दल त्यांनी मोटर 3000 एचपी ची पंप लावूया म्हणून सांगितले आहे.यावेळी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून रोड संदर्भात देखील बोलणे झाले. यावेळी वार्ड क्रमांक 143 शाखाप्रमुख नवनाथ मतकर, उपविभाग प्रमुख संजय गायकवाड साहेब, महिला शाखाप्रमुख पेरणा आतिश खरात ,युवा उपविभाग प्रमुख राजू मगदूम, कार्यालय प्रमुख नरेंद्र बागडे , उपशाखाप्रमुख विजय मयेकर ,उपशाखाप्रमुख प्रवीण पारकर, सुभाष जाधव, अनिल चव्हाण घाडीगावकर उपस्थित होते.
