पुणेकरांनो सावधान! खाजगी टँकरचे पाणी दूषित, जीबीएस रोगाचा धोका – १५ टँकरवर कारवाई
राज्यात जीबीएस (Guillain-Barré Syndrome) रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नुकताच पुण्यातील नांदेड गाव परिसरातील ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा तिसरा आणि राज्यातील चौथा मृत्यू असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.महापालिकेच्या तपासणीत खाजगी टँकरच्या पाण्यात कॉलिफॉर्म आणि इ. कोलाई बॅक्टेरिया आढळले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. दूषित पाण्यामुळे जीबीएस रोगाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे.
सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी, नांदेड, डीएसके विश्व परिसरातील १५ टँकर पॉइंट दूषितपुण्यातील सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी, नांदेड आणि डीएसके विश्व परिसरातील १५ टँकर भरणा केंद्रांवर महापालिकेने तपासणी केली असता दूषित पाणी आढळले. या केंद्रांवर तातडीने कारवाई होणार असून, पुणे महापालिकेने या टँकरना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश:
✅ शक्यतो खाजगी टँकरचे पाणी पिऊ नका.
✅ पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच वापरा.
✅ दूषित पाण्यामुळे त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महापालिकेच्या अहवालानुसार दूषित पाणी टाळल्यास जीबीएस रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो. नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षित पाण्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
