पुण्यात ड्रग्सचा मोठा साठा जप्त; २५ लाखांच्या मालासह तिघे गजाआड
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत २५ लाख ५१ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ही जप्ती करण्यात आली.पहिल्या कारवाईत, विमाननगर येथे गस्त घालत असताना पोलिसांना एक संशयित आढळला. त्याची चौकशी केली असता उमेद मोहम्मद तांबोळी असे नाव समोर आले. त्याच्याकडून ८३ ग्रॅम एमडी १९ लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत, मार्केट यार्ड परिसरात शफिक इस्माईल या व्यक्तीकडून ३५० ग्रॅम गांजा (७ हजार रुपये किमतीचा) जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत, विमाननगर येथे किरण तुजाराम तुऱ्हारे याच्याकडून ३०.३५ ग्रॅम एमडी (६.२७ लाख रुपये किमतीचा) जप्त करण्यात आला.
या तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करीवर मोठा आघात बसला आहे.
