महत्त्वाच्या बातम्या

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

 पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

     राहुल सोमा जावळे (वय ३०, रा. उंब्रज) असे अपघातातील मृताचे नाव आहे, तर दशरथ विष्णू कुडाळकर हे जखमी झाले आहेत.शब्बीर चांदसा पठाण (रा. इस्लामपूर, ता. वाळवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, राष्ट्रीय महामार्गावर येथील हद्दीत कराड ते सातारा मार्गावर जाताना दुचाकीला एका टेंपोसारख्या वाहनाने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे जण रस्त्यावर पडले. जोराची धडक बसल्याने त्यातील एक जण गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्यास डोक्याला मार लागला.अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यादरम्यान गंभीर जखमी युवक राहुल जावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालकावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!