पुण्यातील बालगंधर्व कलादालनात ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ या प्रदर्शनाचे उदघाटन आज पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेशजी कुमार व सिनेअभिनेते शंतनू मोघे यांचे हस्ते पार पडले. हे प्रदर्शन दिनांक ७ मार्च ते १० मार्च बालगंधर्व कलादालन पुणे येथे सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रक
दिनांक :- ७ मार्च ते १० मार्च २०२५
वेळ :- सकाळीं १० ते रात्री ९ पर्यंत
स्थळ :- बालगंधर्व कलादालन, पुणे
या प्रदर्शना मध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे पहावयास मिळणार आहेत.
